‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

Shivaray Kulkarni – आज अमरावतीच्या काँग्रेस पदाधिकाऱयांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वीपासून लावलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो तात्काळ काढण्यात यावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना आणि रुग्णालयाच्या अधिकाऱयांना धमकावल्याच्या कृतीचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांनी निषेध केला आहे.

अमरावतीच्या काँग्रेसवाल्यांचा आता गांधीगिरीवर विश्वास राहिलेला नसून ते ‘पप्पूगिरी’वर उतरले असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. काँग्रेसवाले ज्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गुलामगिरी करतात, त्यांना सावरकरांच्या नखाचीही सर येत नाही. मतांच्या लाचारीसाठी ‘हमास‘ सारख्या (Israel vs Hamas War) दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या कॉंग्रेसजनांकडून यापेक्षा वेगळ्या कृत्याची अपेक्षाच करता येत नाही. गाझापट्टीत दडून बसलेल्या व निरपराध बायका – मुलांची ढाल करून मानवतेवर हल्ले करणाऱ्या हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत. स्वतःचे कुंकू पुसल्यागत काँग्रेसवाले आक्रोश करू लागले आहेत. ‘काँग्रेस का हात गद्दारों के साथ’ ही घोषणा काँग्रेसला (Congress) तंतोतंत लागू पडते आहे.

डोकलाम मध्ये चिनी सैन्याशी भारतीय सैनिक प्राणपणाने लढत असताना चीनच्या दूतावासात गुप्त भेटीगाठी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपला कर्मदरिद्रीपणा वेळोवेळी दाखवला आहे. काल मणिशंकर अय्यर यांनी पॅलेसटाईनच्या नावाखाली हमासचा कळवळा दाखवला आहे. यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रनिष्ठा कशी कळणार, असा सवाल शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

आज जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावतीच्या कॉंग्रेसजनांनी आपल्या ‘हमास’वृत्तीचे दर्शन घडवले. काही तासांच्या आत ही प्रतिमा काढणार असल्याचा इशारा काँग्रेसवाल्यांनी दिला आहे. या प्रसंगी काँग्रेस शिष्टमंडळाने वापरलेली भाषा हेच राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत का दुकान’ आहे का, असा प्रश्न देखील शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. अमरावती काँग्रेसच्या पप्पूगिरीला आम्ही गांधीगिरीने उत्तर देऊ. आता ज्या शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो नाही, तिथे भाजपा कार्यकर्ते स्वतः जाऊन फोटो भेट देतील. तुमच्या मोहब्बतच्या दुकानात तुम्ही हमासला कितीही प्रेम वाटा पण राष्ट्रीय अस्मितांवर हल्ला कराल तर आमच्याशी गाठ असल्याचा इशारा देखील शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे. काँग्रेसने धमकावलेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी असून कुठल्याही संघर्षास आम्ही तयार असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा