Mithun Chakraborthy यांच्या सूनेवर धक्कादायक प्रसंग, म्हणाली, ‘चारही बाजूने पुरुष आणि…’

Mithun Chakraborthy Daughter In Law : जेष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborthy ) हे सध्या प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्याला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. अपोलो हॉस्पिटलने अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून त्यात मिथुनला ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) झाल्याचे सांगितले आहे. अशातच मिथुन चक्रवर्ती यांटी सून व अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) ही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये भीती प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त मुलीच नाही तर, मुलांना देखील अनेक विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागतो. मग ती कोणतीही इंडस्ट्री असो… महिलांच्या चारही बाजूने पुरुष असतात. कधीकधी अशी परिस्थिती येते, जेव्हा अनेक गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत असं वाटतं.’

‘माझ्या आयुष्यात जेव्हा अशी संकटात टाकणारी परिस्थिती आली तेव्हा मी तेथून पळ काढला. आयुष्यात चांगल्या – वाईट गोष्टी घडत असतात. पण तुम्ही तुमच्या इच्छा विरोधात चुकीचा निर्णय घेऊ नये. ही गोष्ट तुमच्या हातात आहे. लोकं कायम तुम्हाला प्रभावित करण्याच काम करत राहतील…’ असं देखील मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा म्हणाली.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी