बच्चू  कडू यांना मोठा दिलासा;  अटकपूर्व जामीन मंजूर

अकोला : राज्यमंत्री तथा अकोल्याचे(Akola) पालकमंत्री बच्चू कडू(Bacchu kadu) यांच्याविरोधात विविध कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत(City kotvali police) गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी बच्चू कडूंनी अकोला जिल्हा न्यायालयात(akola district court) पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आता न्यायालयाने यावर आज बुधवारी निर्णय देत, त्यांचा अटकपूर्वक पुर्णता जामिन अर्ज मंजूर केला आहे.  जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे(District and session judge vivek gawhane)यांनी बुधवारी त्यांना नियमित अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने  कडू यांनी विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर केलेल्या काही रस्त्यांना ग्रा मा क्रमांक नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीने(Bahujan vanchit aaghadi) बच्चूभाऊ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी देऊन पालकमंत्र्यांनी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या तक्रारीवर गुन्हा दाखल न केल्याने तक्रार कर्त्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार  कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी  बच्चूभाऊ यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. गंभीर गुन्हे दाखल झाल्याने प्रशासनातही खळबळ उडाली होती. दरम्यान आपण कोणतीही हेराफेरी केली नसून एक पैसाही खाल्ल्याचे सिध्द झाले तर हात कलम करण्याची  प्रतिक्रीया कडू यांनी दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर  पालकमंत्र्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांची बाजू एकूण घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत दिलासा दिला होता. ९ मे रोजी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार होती, ती आज ११मे रोजी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना नियमित अटकपूर्व जामीन मंजूर केला.

बच्चू कडू यांची बाजू जेष्ठ विधिज्ञ बी के गांधी(b K Gandhi) यांनी मांडली. बच्चू कडू यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असून त्यांनी कोणताही अपहार केला नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातील तक्रारीनंतर वंचितच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची(Governer) भेट घेतली होती. म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बच्चूभाऊ यांना क्लीनचिट देणारा अहवाल यापूर्वीच राज्यपालांना पाठविल्याचे यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा हा अहवाल आणि याच संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा (Nima arora)यांचे पत्रही न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते. बच्चूभाऊ यांना नियमित जामीन मिळाल्याने त्यांच्यावरील आरोपांमधील हवाच निघून गेली आहे. लोकहिताचे काम करीत असताना आणि कोणताही अपहार केलेला नसताना एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधींविरुद्ध अशाप्रकारे गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे हे प्रकरण खोट्या आरोपांमुळे न्यायालयात टिकणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.