Pune Crime : राज्यात पोलिसांचा, कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक घडत असलेल्या घटनांमुळे आली आहे. मुंबईतील अभिषेक घोसाळकर प्रकरण चर्चेत असताना आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार (Pune Crime) करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिल ढमाले असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते. मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते.
काल आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली.
महत्वाच्या बातम्या :
Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली
Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा