जर भारताने शांततेसाठी मध्यस्थी केली तर आम्हीही सहकार्य करू  – रशिया 

नवी दिल्ली-  जगभरात चिंतेचे कारण बनलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर भारताने तात्काळ युद्धबंदीच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेटीसाठी आलेले रसशियाचे परराष्ट्र मंत्री र्गेई लॅवरोव्ह ( Russian Foreign Minister Rege Lavrov)यांना सांगितले की, भारत शांतता प्रयत्‍नात हातभार लावायला तयार असेल तर आमची हरकत नाही.

पंतप्रधान कार्यालयानुसार, रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जिथे त्यांनी युक्रेन संकट आणि त्यांची बाजू सांगितली, तसेच त्यांनी शांतता प्रयत्नांबद्दल माहिती दिली. बैठकीदरम्यान, लावरोव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधानांना अभिनंदनाचा संदेशही पाठवला.

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी लावरोव्ह यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर असेही सांगितले की जर भारताने शांततेसाठी मध्यस्थी केली तर रशिया त्यासाठी तयार आहे आम्हीही सहकार्य करू. इतकेच नाही तर लॅव्हरोव्ह यांनी भारतीय परराष्ट्र धोरणातील समतोलपणाचे कौतुक केले आणि भारताने कोणतीही एक बाजू पाहिली नसून संपूर्ण सर्वसमावेशकतेने आणि तथ्यांसह हे प्रकरण समजून घेतल्यावर भर दिला. एका प्रश्नाला उत्तर देताना लावरोव्ह यांनी अमेरिकेचे नाव न घेता सांगितले की, भारत-रशिया भागीदारी त्यांच्या (अमेरिकेच्या) दबावामुळे प्रभावित होणार नाही.