Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी

Chhagan Bhujbal: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. भुजबळांनी या पत्राविषयी पोलिसांना माहिती दिली आहे.

शिकच्या कार्यालयात पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. शिंदे देशमुख नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिल्याचे समजते. यामध्ये छगन भुजबळ यांना सावध करण्यात आलं आहे. तुमची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. तुम्हाला उडवण्यासाठी 50 लाखांची सुपारी घेण्यात आली आहे. हे 5 जण रात्रभर तुम्हाला शोधत फिरत आहे. तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा. इतकचं नाही या पत्रात गुन्हेगारांच्या पत्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

 

दरम्यान, याविषयी गंभीर मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांना प्रतिक्रियेची विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोणीही कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. ते शनिवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा