आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव

मुंबई : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Bail Application) उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत.

दरम्यान, नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे प्रकरण ?

शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.