पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंना अटक

भंडारा : सत्तेची मस्ती डोक्यात ठेवून पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणं भंडाऱ्याचे तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे.

व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा अणि 50 लाख चोरी केले असल्याचा कारेमोरे यांनी आरोप लावला होता. शिवीगाळ करत दमदाटी करतानाचा आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर अखेर आज त्यांना त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केली. विविध कलमान्वये आज अटक करून त्यांना कोर्टात हजर केले आहे.

या आमदाराच्या या धिंगाण्याची बातमी जिल्ह्यात पसरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर काल कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र, आज पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.