सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर – बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी (MVA MLA’z) विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly) आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.