Mohammed Shami Retirement | ‘मी सकाळी उठेन आणि निवृत्ती…’, दुखापतीशी झुंजत असलेल्या शमीचे मोठे वक्तव्य

Mohammed Shami on Retirement : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला शमी सध्या इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. पण याच दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

तो क्रिकेटला कधी अलविदा करणार हे शमीने सांगितले आहे. तो म्हणाला की, कोणत्याही दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येऊ शकतो. त्या दिवशी मी सकाळी उठेन आणि माझ्या निवृत्तीबद्दल ट्विट करेन. शमीने नेटवर्क-18 शी बोलताना असे सांगितले आहे.

‘मला समजावून सांगणारे कोणी नाही’
वेगवान गोलंदाज शमीने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक 24 बळी घेतले होते. यानंतर त्याच्या घोट्याला दुखापत झाली. मात्र, ही दुखापत कधी झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. सध्या या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर आहे.

दरम्यान, निवृत्तीबद्दल (Mohammed Shami Retirement ) बोलताना शमी म्हणाला, ‘ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल, तेव्हाच मी ते सोडेन. मला कशाचंही ओझं घ्यायची गरज नाही, ना कुणी मला समजावून सांगणारं आहे. तसेच माझ्या कुटुंबातील कोणीही मला काही सांगत नाही. ज्या दिवशी मी सकाळी उठलो तेव्हा मला वाटले की मला मैदानवर जायचा कंटाळा आला आहे. त्याच दिवशी मी स्वतः ट्विट करेन की मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.’

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू