मोहित कंबोज हे कोणाच्या इशाऱ्याने काम करता हे सर्वांना माहीत आहे – मिटकरी

मुंबई : भाजपाचे मोहित कंबोज (Mohit Komboj)हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते. यापूर्वी त्यांनी काही नेत्यांच्या बाबतीत केलेले भाकीत खरे ठरले असून नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत (Nawab Malik, Anil Deshmukh and Sanjay Raut) हे त्याचे उदाहरण आहेत.

दरम्यान, त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बाबत देखील एक ट्वीट केले होते. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटद्वारे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा (Vidya Chavan) विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. विद्याताई जय श्रीराम या त्यांच्या वक्तव्यावरुन आता (Politics) राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता राष्ट्रवादीने देखील जशास तसे उत्तर दिले आहे. मोहित कंबोज हे कोणाच्या इशाऱ्याने काम करता हे सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) मोहित कंबोजांना आरोप करण्यासाठीचं ठेवले आहे. मोहित कंबोजचा महाराष्ट्रामध्ये दुरवर संबंध नाही. ते ज्यांच्यावर आरोप करतात ते त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत. त्यामुळे विविध कंबोजला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही अशी टीका मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली.