अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही – फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये(BKC) घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis, Manes President Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.

यावेळी फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो मला उत्तर द्या, मुंबईत कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोकांचा मृत्यू झाला की नाही?, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही?, वसूलीच्या आड येणाऱ्यांना मनसूख हिरेन बनलं की नाही?, १०० कोटींच्या वसूलीसाठी गृहमंत्री तुरुंगात गेले की नाही?, दाऊदचा मित्र असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही?, आपल्या मजूर- कामगार बांधवांना अणवानी पायांनी मुंबई सोडावी लागली की नाही?, मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे बंद आहेत की नाही?, यशवंत जाधवची संपत्ती वाढली की नाही? आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापौकी एकाही गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का? आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नाही.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

बाबरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे.रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असं म्हटलं तर किती मिर्ची लागली. मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, अरे उद्धवजी, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु? अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.