कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे…, बाप-बेटे जेलमध्ये जाणारच – संजय राऊत

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या ( kirit somaiya ) आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल.. आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनतर आज (१६ फेब्रुवारी ) किरीट सोमय्या यांनी ट्विट करत पुन्हा सोमय्या पिता पुत्रावर निशाणा साधला आहे. ‘बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे.. जय महाराष्ट्र!’ असं ट्विट करत संजय राऊत यांनी सोमय्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.