‘सोन्या’सारखा माणूस हरपला, बप्पी लाहिरी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.

मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षाचे होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात.

बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते.