मराठमोळा अजय लोबो बनला आंतरराष्ट्रीय डिजे, आयपीयलमध्ये देखील बजावली उत्कृष्ट कामगिरी

Ajay Lobo: प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डिजे अजय लोबो याने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात डिजे म्हणून काम केले शिवाय त्याने आयपीयलमध्ये देखील नावं कमावलं. यावर्षात त्याने जपान, अमेरीका, इटली अशा विविध देशात दौरे केले. यावर्षीच्या आयपीयलमध्ये अजयला ‘बेस्ट डिजे ऑफ द सिझन’चा पुरस्कार मिळाला. डिजे व्यतिरिक्त त्याने बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून देखिल प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्री आलिया भट हिच्या डार्लींग्स सिनेमात तर अभिनेत्री परिणीती चोप्रा हीच्या मुंडा ही चाहिदा या पंजाबी सिनेमासाठी त्याने संगीत दिले आहे. आय आय टी बॉम्बे या इंस्टिट्युटमध्ये देखिल तो बैस्ट डिजे पुरस्काराचा मानकरी ठरला.

अजय लोबो यांचा जन्म पालघर येथील सिडको गावात, सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे. तर वसई येथे संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर २०१४ मध्ये त्याने डिजे म्हणून सुरूवात केली. आत्तापर्यंत त्याने अनेक कमर्शिअल तसेच काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये डिजे म्हणून काम केल. तसेच त्याने २०२० मध्ये ‘भेदभाव’ आणि २०२१ मध्ये ‘द नाईट ऑफ मिस्ट्री’ अशी दोन इंग्रजी भाषेत पुस्तके लिहीली. तसेच त्याने स्वत: संगीत दिलेल्या एका इंटरनॅशनल गाण्याला २८९ मिलीयन लोकांनी पसंती दिलेली आहे. तसेच अमेरीका, स्पेन, मेक्सिको, अफगाणिस्तान अश्या देशांमध्ये आजही मॅड हेटरर्स ट्रांस या गाण्याची क्रेझ आहे. डिजे अजय लोबो याचे महाराष्ट्रतच नव्हे तर परदेशातही फॅन फोलोवींग आहे. त्याते इंस्टाग्रामवर १ लाख २७ हजार फोलोवर्स आहेत. त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’