Vishal Patil | खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

मुंबई | सांगली लोकसभेत वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष.ॲड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या पाठिंब्या बद्दल आभार मानले. यावेळी विशाल पाटील (Vishal Patil) यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप