भर पार्टीत पतीने गरोदर सना खानला नेले ओढत, अभिनेत्रीला मिळालेली वागणूक पाहून संतापले लोक- Video

Mumbai- बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यादरम्यान पार्टीतून असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोक संतापले आहेत.

हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सना खानचा (Sana Khan) आहे, जिने मुफ्ती अनस सईदसोबत लग्न केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत (Iftar Party) सना खान पती अनस सईदसोबत (Sana Khan Husband Anas Sayed) पोहोचली होती. मात्र, यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे चाहते संतापले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनाचा पती अनस कसा तिचा हात धरून तिला जबरदस्तीने खेचत आहे. दुसरीकडे, जेव्हा गरोदर सना त्याला सांगते की ती थकली आहे आणि चालू शकणार नाही, तेव्हा तो तिचा हात सोडून स्वतः पुढे जातो.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मेंदू ठिकाण्यावर आहे का, ती गर्भवती आहे ‘. तर दुसर्‍याने लिहिले आहे, ‘सिरियसली, आरामात भाऊ. ती तुझी एकुलती एक बायको आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे, ‘तो तिला अशा अवस्थेत का ओढत आहे?’.