Rahul Dravidनंतर Ashish Nehra होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

Future Team Bharat coach : भारताचा (Bharat) माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराबाबत (Ashish Nehra) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नेहरा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो, असे बोलले जात आहे. सध्या माजी गोलंदाज आयपीएल (IPL) फ्रँचायझी गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणाच्या मोसमातच नेहराच्या प्रशिक्षणाखाली विजेतेपद पटकावले. यानंतर, आयपीएल फ्रँचायझी पुढच्या हंगामात म्हणजे 2023 मध्ये अंतिम फेरीत पोहोचली.

दुसरीकडे, भारतीय संघाचे (Team Bharat) विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा करार नोव्हेंबरमध्ये संपणार असून, त्यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. त्यामुळे नेहरा प्रशिक्षक बनेल अशी चर्चा आहे पण ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नेहराला भारताचा प्रशिक्षक बनण्यात रस नाही कारण या माजी गोलंदाजाचा गुजरात टायटन्ससोबत २०२५ अखेरपर्यंत करार आहे.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या (BCCI) एका माजी अधिकाऱ्याने सांगितले, “समजा भारताने विश्वचषक जिंकला, तर द्रविडला त्याचा कार्यकाळ वाढवायचा नाही कारण त्याला त्याचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने संपवायचा आहे. पण तुम्ही मला विचाराल तर विश्वचषकानंतर बीसीसीआयने प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करायला हवा. त्याने राहुल द्रविडला रेड बॉलचे प्रशिक्षक म्हणून काम सुरू ठेवण्यास सांगितले पाहिजे.

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2021 टी-20 विश्वचषकात टीम इंडिया ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर रवी शास्त्रीचा करार संपला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. आता राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Head coach) कायम राहतो की त्याच्या जागी दुसरे कोणी येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या – हसन मुश्रीफ

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

Virat Kohli ला आलीय इतिहास घडवण्याची संधी; ‘या’ विश्वविक्रमाच्या तो आहे अगदी जवळ

Pradhanmantri Kisan Yojana : ८१५९५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार केंद्राचे पैसे