Fake video | ‘बिल्डर का बेटा हूँ ‘भाई’… अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्याची ओळख पटली

Fake video | पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी नुकतेच अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सेल्फी व्हिडिओत तो प्रचंड शिवीगाळ तर करताना दिसत होता, तसेच चीड, संताप, येईल असे शब्द त्याने उच्चारले आहेत. या रॅप साँगमधून तो ‘हो मी आहे बिल्डरचा पोरगा म्हणून सुटलोय’, असं म्हणत त्यानंतर रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्यासंबंधी रोष आणखी वाढला. परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या आईने समोर येत हा व्हिडिओ फेक (Fake video) असल्याचा दावा केला.

त्यानंतर पुणे पोलीस हा व्हिडिओ खरा की आहे ‘डीपफेक’ याबाबत चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. हा फेक व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा फेक व्हिडिओ बनवणाऱ्याची ओळख देखील पटवली आहे. आर्यन देव निखरा असे फेक व्हिडिओ बनवणाऱ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील असून त्याने ग्वाल्हेर येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तो मीम बनवतो. त्यानेच पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे डीफफेक व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप