ठाकरे सरकारला मोठा धक्का, बहुमत चाचणी रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई  – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राज्यकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय उलाथापालथीला प्रचंड वेग आला आहे. यातच  ठाकरे सरकारला (Thackeray Gov) उद्याच बहुमत चाचणीला (majority test) सामोरे जावे लागणार की नाही, या प्रश्नाच्या उत्तरासाठी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या(Supreem Court) निर्णयाकडे लागलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टाने रात्री नऊ वाजता निकाल जाहीर केला.

सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी (MVA) सरकारला मोठा धक्का देत बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत बहुमत चाचणी चाचणी घेऊ नये, असा युक्तिवाद शिवसेनेच्या (Shivsena) वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) वारंवार करत होते. परंतु बहुमत चाचणी लांबणीवर टाकण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत ठाकरे सरकारला दणका दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि न्या. पारडीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.