Vijay Wadettiwar | आरोपीला फायदा पोहोचविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ, विजय वडेट्टीवारांचा आरोप

Vijay Wadettiwar | पुणे शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एका भरधाव कारने तरुण-तरुणीला चिरडल्याने अपघात झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.  या अपघातात दोन्ही अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी  घटना घडली आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुणे पोलिसांनी आरोपीला फायदा पोहोचविण्यासाठी तपासात मुद्दाम घोळ घातला असल्याचा आरोप केला आहे.

पुणे अपघात प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली, तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी, असे आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप