Muralidhar Mohol | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला
Muralidhar Mohol | पुणे शहरात काल घडलेल्या अत्यंत दुःखद अपघातामुळे दोन संगणक अभियंता प्राणास मुकले. त्या संदर्भात आज भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.
यावेळी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) , हर्षदा फरांदे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, प्रदीप देशमुख, लतीफ शेख, रूपाली पाटील, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, राहुल भंडारे व इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून गेल्या काही काळापासून अनिर्बंध पद्धतीने वाढत असलेली पब संस्कृती पुण्याच्या या प्रतिष्ठेला धक्का देत आहे. तसेच त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन आणि त्यामुळे होणारे अपघात याला आळा घालायचा असेल तर पुण्यातील पब वर अत्यंत कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना सांगितले.
यावेळी कालच्या अपघाता संदर्भात पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यामधील वाढत्या पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी आवश्यकता सर्व कठोर उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी उपस्थित शिष्टमंडळाला केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Prakash Ambedkar: शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील! प्रकाश आंबेडकरांचा दावा
Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे
Arvind Kejriwal | “भाजपने देवेंद्र फडणवीस यांना संपवले आता पुढचा नंबर..”, अरविंद केजरीवाल यांचा आरोप