शरद पवारांच्या विरोधात दिलीप वळसे पाटीलांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आवमान कारक केलेल्या वक्तव्याच्या निषेधारत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज प्रदेश कार्यालयासमोर दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन मुंबई शहर अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आता शरद पवार साहेबांवर निष्ठा आणि प्रेम करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले (Nilesh Bhosale) यांनी म्हटले आहे.

यावेळी निलेश भोसले पत्रकारांशी बोलताना म्हटले की दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी आमदार आणि मंत्री केले जर पवार साहेबांनी त्यांना आमदार केले नसते तर आज दिलीप वळसे पाटील कुठे असते त्यांची लोकप्रियता काय आहे. पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नावावर मतदान करणाऱ्या जनतेने त्यांना आज पर्यंत निवडून दिले आहे. आणि तेच आज शरद पवार साहेबांच्या विरोधात वक्तव्य करत हे हस्यास्पद आहे. शरद पवार साहेबांच्या सभेला जनतेची आणि कार्यकर्त्यांची जमत असलेली मोठी गर्दी पाहून बंड केलेल्या मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे पवार साहेबांन विरोधात असे वक्तव्य करत आहेत असेही निलेश भोसले यांनी म्हटले आहे.

निलेश भोसले पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस मधला प्रत्येक युवा कार्यकर्ता शरद पवार साहेबांबरोबर आहे. साहेबांविरोधात कोणीही कुठलेही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही खपवून घेणार नाही.. ही आज सुरुवात आहे. पुढे आम्ही आंदोलन पेटवत नेऊ असे निलेश भोसले यांनी म्हटले. जो व्यक्ती स्वतःच्या जीवावर एक आमदार देखील निवडून आणू शकत नाही आजपर्यंत जे काही स्वतःभोगली ती शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि नावावर तोच व्यक्ती आज शरद पवार साहेबांन विरोधात अवमान जनक शब्द वापरून त्यांच्यावर टीका करतात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे कदापिही सहन करणार नाही दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक, मुंबईचा युवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कदापी सहन करणार नाही त्यांच्या विरोधात ताकतीने महाराष्ट्रभर आंदोलन करणे आहे. यापुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिलीप वळसे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असेही निलेश भोसले यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मात्र टीका करणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत पुण्याचा पालकमंत्री पद देखील भूषवलं नाही. ज्या व्यक्तीची पुण्याचे पालकमंत्री होण्याची पात्रता देखील नाही अशा व्यक्तीने पवार साहेबांच्या विरोधात बोलणे असोबनीय आहे. जर शरद पवार साहेबांन विरोधात असंच बोलत असणार तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला फिरू देणार नाही.

शरद पवार साहेबांमुळे तुमच्यासारखे बिनडोक निवडून आले आणि मंत्री झाले. एकेकाळी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार साहेब यांचे विश्वासू म्हणून ओळख होती. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम होता की दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे यात पवार साहेबांची खेडी आहे का? असा संभ्रम निर्माण होतो. मात्र आता हे स्पष्ट झालं आहे की जे लोक गेले आहेत त्यांच्या डोक्यातच घाण आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या 40 लोकांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे देखील यावेळी निलेश भोसले यांनी म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मुंबई शहर अध्यक्ष ॲड. निलेश भोसले यांनी केले. यावेळी मुंबई कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, मेहुल जाधव, ट्विनकल परमार, काशिफ शाह, नजीर शेख, गणेश स्वामी, रवि अहिरे, अशफक भाई, अरमान खान, संतोष पवार, गौतम खंडागळे, राजू थोरात यांची उपस्थिती होती.