LokSabha Elections 2024 | ठरलं! लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतच्या विरोधात उभा राहणार काँग्रेसचा ‘हा’ नेता

विक्रमादित्य सिंह काँग्रेसच्या वतीने मंडीतून लोकसभा निवडणूक (LokSabha Elections 2024) लढवणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह विरुद्ध भाजपाची कंगणा राणौत अशी लढत पाहायला मिळू शकते. असे असले तरीही, अद्याप विक्रमादित्य यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही तसे संकेत दिले आहेत. दिल्लीतील सीईसी बैठकीत विक्रमादित्य सिंह यांच्या नावावर चर्चा झाल्याचेही मानले जात आहे. सीएम सुखू म्हणाले की, मंडीतून तरुण नेता मिळणार हे निश्चित आहे. तर प्रतिभा सिंह यांनी सांगितले की, विक्रमादित्य सिंह हे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. सध्या या जागेवरून प्रतिभा सिंह खासदार आहेत.

मंडीचे लोक नेहमीच आमच्यासोबत राहिले – प्रतिभा सिंह
प्रतिभा सिंह म्हणाल्या, “कंगना काय करतेय किंवा काय म्हणतेय हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. मंडीतील जनता नेहमीच आमच्यासोबत आहे. मी कठीण परिस्थितीतही जागा जिंकली आहे.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांच्या आईने आधीच आपला निर्णय जाहीर केला होता. निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडायचे आणि आता आपल्या मुलाने या जागेवरून निवडणूक (LokSabha Elections 2024) लढवावी अशी त्यांची इच्छा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते