“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; पटोलेंचा अजब दावा

Nana Patole on Lumpy Virus: गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘हा लम्पी व्हायरसचा आजार आहे, नायजेरिया हा देश आहे. बरीच वर्षे तिथे होते. तिथून आणलेले चिते तिथून आणले आहेत. चित्ता आणि गायीवरील डाग विषाणूंसारखेच असतात. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक ही यंत्रणा शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी केली आहे.असं पोरकट वक्तव्य पटोले यांनी केलं आहे.