Vasant More | पुण्यात कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न चालणार, वसंत मोरेंचा रवींद्र धंगेकरांना टोला

Vasant More | पुणे लोकसभा (Pune LokSabha 2024) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हे तिन्ही उमेदवार जोरदार प्रचारही करत आहेत. या प्रचारा दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीत देखील कसबा पॅटर्न चालणार आणि मीच जिंकणार असे विधान रवींद्र धंगेकर यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे (Vasant More) यांनी धंगेकरांना टोला मारला आहे.

धंगेकरांच्या विधानाबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना विचारले असता त्या प्रश्नावर ते म्हणाले की, ही निवडणुक लोकसभेची आहे. त्यामुळे या निवडणुकीत कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुण्यात चालणार, अशी भूमिका मांडत वसंत मोरे यांना रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.

धंगेकरांच्या कसब्यातील कामाबद्दल बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी गेल्या १५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करतोय, शिवाय या शहराचा नगराध्यक्ष राहिलोय, विरोधी पक्षनेता राहिलोय, स्टँडिग कमिटी २ वर्षे चालवलीय. त्यामुळे मी शहराच्या भूमिकेवर काम केले आहे, ना की एकाच मतदारसंघाच्या भूमीकेवर काम केलं. कसब्यात वाडा संस्कृती जास्त प्रमाणात आहे. पण मला नाही वाटत मी तिकडे गार्डन पाहिलं, दवाखाना पाहिला, ज्या गोष्टी मी माझ्या भागात पाहिल्यात. शाळा, अभ्यासिका, गार्डन, दवाखाना मी निर्माण केला आहे. पण कसब्यात या गोष्टी झालेल्या नाहीत, असे म्हणत वसंत मोरेंनी अप्रत्यक्षपणे कसब्यात विकासकामे झाली नसल्याचे म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके