आउटगोइंग सुरूच : ठाण्यानंतर आता या महापालिकेत शिवसेनेला पडले खिंडार

मुंबई : शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, सत्ता गेल्यानंतर सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आणि ४० आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यानंतर आता पक्षालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते. त्याचवेळी नवी मुंबईतील 32 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.

शुक्रवारी नवी मुंबईतील ३२ नगरसेवकांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. नगरसेवक म्हणाले, “आम्ही त्यांच्या (एकनाथ शिंदे) सोबत राहू. त्यांनी कधीही कोणाचा फोन नाकारला नाही. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याने फोन केला तरी तो फोन रिसिव्ह करतात. दरम्यान, ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी गुरुवारीच शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यानंतर आता लवकरच अनेक ठिकाणचे नगरसेवक, नेते देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील, असा शिंदे गटाचा दावा आहे.