गोविंदाना आरक्षण हा अतिशय बालिश निर्णय आहे; विश्वंभर चौधरी यांची शिंदे सरकारवर टीका

मुंबई –  दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट) विधानसभेत केली आहे. तसंच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

आम्हीसुद्धा लायब्ररी (Library) सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे का, असा सवाल परीक्षार्थींनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी देखील सरकारला चिमटे काढले आहेत. ते म्हणाले, मला वाटत नाही की आजपर्यंत एवढे भयंकर मुख्यमंत्री या राज्याला याआधी लाभले आहेत. गोविंदाना आरक्षण हा अतिशय बालिश निर्णय (Govinda Reservation is a Very Childish Decision) आहे.