शिवसेना समर्थक आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फोन; मुख्यमंत्री भडकले

मुंबई – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कसं मतांचं गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत.

शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना राष्ट्रवाद आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केले. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  संतप्त झाल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून (Nationalist Congress and Congress) शिवसेना समर्थक आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जात असल्यानं मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार नाही, त्याचबरोबर शिवसेना (Shiv Sena) समर्थक अपक्ष उमेदवारांची मतंही शिवसेनेच्याच उमेदवारांना देण्याच्या भूमिकेत शिवसेना असल्याचे समजते. मुंबई तक ने याबाबत वृत्त दिले आहे.