Shivajirao Garje | राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक २७ मे रोजी गरवारे क्लब हाऊसमध्ये; प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जेंची माहिती

Shivajirao Garje | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, प्रवक्ते, पॅरंट बॉडी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला व युवक जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष व समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप