Umesh Patil | एमआयडीसीच्या आडून उद्योगपतींच्या घशात भूखंड घालण्याचा रोहित पवारांचा घाट, उमेश पाटलांचा आरोप

Umesh Patil | कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्या आणि भारताला करोडो रुपयांना फसवलेला उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून घाट घालत भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता एमआयडीसी व्हावी की काही ठराविक उद्योगपतींना आणि व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी रोहित पवार यांनी एकाच गावात एमआयडीसी करण्याचा अट्टाहास सुरू केला आहे. एकाच ठिकाणी एमआयडीसी होण्याचा इतका आग्रह रोहित पवार यांचा का होता याचा अभ्यास केल्यानंतर फार मोठा भूखंड घोटाळा इथे उदयाला येत असल्याचे लक्षात आल्याचे उमेश पाटील म्हणाले.

ज्या कर्जत – जामखेडच्या पाटेगाव व खंडाळा येथील ४५८ हेक्टर म्हणजे जवळपास १२०० एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्याठिकाणी मूळ जमीनदार, शेतकरी आहेत. काही जमीनी द्यायला तयार आहेत तर काही गावे जमीनी देण्यास विरोध करत आहेत. या गावातील जमीनींपेक्षा इतर गावात जी जागा आहे ती उपजत जागा आहे ती वापरली जाऊ नये असा लोकांचा आग्रह आहे. मात्र रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसी झाली पाहिजे हा आग्रह का आहे तर मुळ शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा घेतलेल्या उद्योगपतींना भरमसाठ मोबदला मिळावा यासाठी असल्याचा थेट हल्लाबोलही उमेश पाटील यांनी केला.

यावेळी उमेश पाटील यांनी पाटेगाव, खंडाळा गावात ज्यांनी जागा घेतलेल्या त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सहा ते सात ठिकाणी जमीन आहे.याशिवाय महाजन, अग्रवाल, पोद्दार, छेडा, खन्ना, जैन, शेट्टी, मेहता यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लोकांनी रोहित पवार यांना निवडून दिले आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी केला.

संपादीत जमीनीमध्ये कवडीमोल दराने जमीनी खरेदी करता येत नाही हे रोहित पवार यांना चांगले माहित आहे. मात्र तरीही सन २०२१-२२ मध्ये जमीनी खरेदी केलेल्या आहेत. रोहित पवार यांना तरुणांच्या रोजगाराचा एवढा कळवळा आहे तर स्थानिक लोकांचा विरोध असताना रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसीचा आग्रह का आहे हा खरा चेहरा जनतेसमोर आता यायला लागला आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

उमेश पाटील यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्यामध्ये राहुल महाजन यांचा गट क्रमांक – (१९, २८/१) फेरफार क्रमांक (६२२,६३३), श्रीगोपाळ ताराचंद पोद्दार गट क्रमांक- (३०,३७/१/अ/१)(५९८),(५९७),(५९७),(५७७),(६२६),नयन गणेश अग्रवाल – गट क्रमांक (३०,३७/१/अ/१, ३७/१/ब,४८,६६,५६)(५९८),(५९७),(५९७),(५७७),(६२६),(५९७),अमोल माधव पाटील गटक्रमांक – (३०,३७/१/अ/२,३८)(६१७),(६१३)(६१४),मे श्री असोशिएटस (अग्रीकल्चर) भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुलक्षणा सुर्यकांत जाधव गट क्रमांक- (३०,३७/१/अ/१,३३,६७/२)(६६१),(६६४),(६६४),(६४४),फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड गट क्रमांक- (३५,३१,३९/१,५७,)(२७०),(२७०),(२७०),निरव दिपक मोदी गट क्रमांक- (३१,३५,३९/१,५८,५९,६१,)(२६५),(२६५),(२६५),(२७१),(२७१),(२६५),महादेव दादा शिर्के (६४४),(६४३),(६३९),रिधीमा निलेश जैन (६१६),(५६७),आरित्रो आशिष रॉय (६१४),अमिष नवीन छेडा (६१४), (५६५),पंकज विनोद खन्ना (६१६),(५६५),ओमप्रकाश पुत्र धारुमल मेहता (२८८),कमलेश रतीलाल शहा (३२९),(३२५),(३२५),कुंजल नवीन छेडा (५७८),जितल निकेत रांभिया (५७८),तरुण मणिलाल गाला (५७८),राजेश नानजीभाई गाला (५७८),विनोदकुमार मणिलाल गाला (५७८), राजित रश्मीन शाह (५६५),उमेश आनंद शेट्टी (६००),सोमनाथ नारायण आळशी (६००),संतोष पांडुरंग देशमुख (६००),विनोद गंभीर पाटील (६४१),(६३७),ओमप्रकाश सावरमल अग्रवाल (५७७),गणेश ओमप्रकाश अग्रवाल (५७७),संजय कृष्णाजी भेरे (५७७),निकेत खुशल रांभिया (६२६),नेहा रामचंद्र सावंत (६२६),प्रिती अभिजीत भांडेपाटील (६२६),फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लि. कंपनीकरीता जनरल कु. मु. सदानंद शंकर यादव (४३५),वर्षा विवेक पाटील (६३७),फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लिमिटेड (२७०),आदींनी जागा खरेदी केल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय फरार गुन्हेगार नीरव मोदी यांनी सर्वाधिक जागा खरेदी केली असल्याचे समोर येत आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

एमआयडीसी प्रस्तावित झाल्यावर जमीनी खरेदी झाल्यात अशा नाही त्याअगोदरही झाल्या आहेत परंतु जे तिथले खातेदार आहेत,मुळ शेतकरी आहेत, त्यांना मोबदला न मिळता उद्योगपतींना, व्यापाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्यासाठी, बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र उभे करत आहे ते कर्जत – जामखेड नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला आमदार रोहित पवार हा किती फ्रॉड आहे आणि त्यांचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा आता समोर आणला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप