श्रीतुळजाभवानी मातेचे मुख्य गर्भगृहाला येणार सोन्याची झळाळी

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदीराचे मुख्य गर्भगृह पुरातत्व खात्याच्या मान्यतेनंतर सोन्याच्या पातळ पञ्याने मढवुन घेण्याचा मानस व्यक्त करुन तिर्थक्षेञ जेजुरीच्या धर्ती तिर्थक्षेञ तुळजापूरचा  विकास करण्याचे नियोजन असल्याची माहीती  श्रीतुळजाभवानी मंदीराचे विश्वस्त तथा आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवार पञकार परिषद घेवुन दिली.

यावेळी पुढे बोलताना पाटील पुढे म्हणाले की, तिर्थक्षेञ तुळजापूर चा विकासासाठी ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करीत आहोत. श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर चा विकास विचार विनिमय करुन योग्य सल्लागार नेमुन  सर्वांची मते  विचारात घेवुन  योग्य व्यवस्थापन व  दिर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करुन विकास आराखडा तयार केला जाणार आहे हे काम करताना  पुरातत्व विभागाचा मान्यता घेतली जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, यासाठी राज्याचे पुरातत्व विभाग प्रमुख डाँ तेजेस गर्ग यांच्या नेतृत्वाखाली पथक येवुन पाहणी केल्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवाल,नंतर यास मुर्त स्वरुप आणले जाणार आहे. देवीदर्शन करुन बाहेर पडण्याचा मार्गाचा पुर्वीचा आराखडा योग्य नाही यासाठी नवीन आराखडा बनवला जाणार आहे.टोळभैरव दरवाजा उघडण्याबाबतीत प्रयत्न चालु असुन येथे सीसीटीव्ही बसवुन चेकिंग करुन नंतर या दरवाजा वापर करण्याचे नियोजन आहे. तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काही विकास कामे झालीआहेत पण त्याचा वापर होत नाही यातील पापनाश तलावाचे  बीओटी तत्वावर विकास करण्याचे नियोजन असुन येथे लाईट शो बोटींग कारंजे व मनोरंजन सोयीसुविधा उभारण्याचे नियोजन आहे.

श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालय व सैनिक शाळेचा दर्जा समाधानकारक नाही.  हा दर्जा सुधारण्यासाठी काँलेज आँफ इंजिनियरींग पुणे  कँपच्या  मंडळीना येथे बोलवुन याची पाहणी करुन दर्जा वाढविण्यासाठी काय करावे लागेल याचा अहवाल घेऊन इंजिनिअरिंग काँलेज व सैनिक शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं देखील ते म्हणाले.