भाजपची मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे, रुपाली पाटलांचा घणाघात

पुणे : भाजपमधून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळमध्ये भाजपला जोरदार झटका दिला आहे. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन संकटात सापडले आहेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद दोघे एका पक्षात असल्यापासून सुरु आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरवात केली आहे.

भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत आपली ताकद दाखवत भाजपला शह दिला होता. त्यानंतर आता भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.

यावरून आता नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. ‘भाजपचे 21 नगरसेवक अजित पवार व एकनाथ यांच्या उपस्तिथीत राष्ट्रवादित, भाजपचे संकट मोचकच संकटात आले ? भाजपची मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे.’ असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे.