कॉंग्रेसच्या ‘त्या’ निर्लज्ज आमदाराला प्रियंका गांधींनी झाप-झाप झापलं

मुंबई : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,’ असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितलं की, ‘एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.

कॉंग्रेस आमदाराच्या या अतिशय हीन वक्तव्यावरून देशभरातून संताप व्यक्त होत असताना कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील रमेश कुमार यांना झापलं आहे. ‘तुम्ही असं बोलूच कसं शकता, अस म्हणत प्रियंका गांधींनी त्यांना सुनावलंय. इतकंच काय तर त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवलाय. केआर रमेश यांच्या वक्तव्या कोणत्याही स्थितीत बचाव करता येऊ शकत नाही. बलात्कार हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. त्याच्यावर अशाप्रकारची केलेली वक्तव्य ही शोभा देत नाही’, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी केआर रमेश कुमार यांचा समाचार घेतला.