भारताने दोस्ती निभावली; मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे पुतिन सरकारनेही केले कौतुक

नवी दिल्ली – भारताने जी-7 देश आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रशियन तेलाच्या किंमतीवरील मर्यादा लादण्याचे समर्थन केले नाही.भारताच्या या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे.रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी रशियातील भारताचे राजदूत पवन कपूर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान हे वक्तव्य केले.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, उपपंतप्रधानांनी 5 डिसेंबर रोजी जी 7 देश आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी जाहीर केलेल्या रशियन तेलावरील किंमत मर्यादा लादण्याला पाठिंबा न देण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. याआधी सप्टेंबरमध्ये जी-7 देशांनी रशियाकडून तेल आयातीवर किंमत मर्यादा लागू करण्याचे मान्य केले होते.

निवेदनानुसार, नोवाक म्हणाले की ऊर्जा संकटाच्या दरम्यान पूर्व-दक्षिण देशांना ऊर्जा संसाधनांचा पुरवठा आणि ऊर्जा निर्यात करण्यासाठी रशिया पूर्णपणे जबाबदार आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, 2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत भारताची रशियन तेलाची आयात 16.35 दशलक्ष टनांपर्यंत वाढली आहे. विशेष म्हणजे युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल आयात करणे सुरूच ठेवले.

भारताला तेल पुरवण्यात रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे

या वर्षीच्या उन्हाळ्यात रशिया भारताला चा पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश होता. याशिवाय, रशियाकडून तेल उत्पादने आणि कोळशाच्या पुरवठ्यातही वाढ झाली आहे.