NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली निवडणुकीची तयारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षक यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज झालेल्या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार एकनाथ खडसे, हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, मुंबई विभाग कार्याध्यक्ष राखीताई जाधव, मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Mahayuti Meeting : भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांचीही होणार मुंबईत संयुक्त बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, आणि निरीक्षकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना इंडिया आघाडी संदर्भात माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्तीचे पत्र देण्यात आले. बीड जिल्ह्यातील बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सुशीलाताई बोराडे यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चांदपीर इनामदार यांचा शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.