नगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष

मुंबई   – नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष ठरला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला अशा बाता मारणाऱ्या भाजपला या निवडणुकीत दुसरा नंबरही गाठता आलेला नाही असा जोरदार टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

नगरपंचायत निवडणूकीत विरोधकांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याची अनेक षडयंत्र रचली तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेने नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष – ३०, उपनगराध्यक्ष – ३०, शिवसेना नगराध्यक्ष – २७ उपनगराध्यक्ष – १६, कॉंग्रेस नगराध्यक्ष – २० उपनगराध्यक्ष – २१, भाजप नगराध्यक्ष – २०, उपनगराध्यक्ष – २१ याचा अर्थ एक नंबरचा पक्ष दुसर्‍या नंबर गाठू शकला नाही असेही महेश तपासे म्हणाले.