Rohit Sharma | चार कोटींची रेंज रोव्हर सोडून रोहित शर्माने चालवली बस, चाहत्यांसह टीममेट्सनीही घेतले सेल्फी (Video)

Rohit Sharma | रोहित शर्माचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्रिकेटच्या मैदानावर रोहितच्या सेन्स ऑफ ह्युमरची बरोबरी नाही. तो तरुण खेळाडूंसोबत मस्ती करण्यात कमी पडत नाही. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो बस चालवताना दिसत आहे.

रोहित मुंबई इंडियन्सची बस चालवताना दिसला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची बस चालवताना दिसत आहे. यावेळी त्याने बससमोर उभ्या असलेल्या लोकांना ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी दूर जाण्याची विनंती केली. यादरम्यान टीममेट आणि चाहत्यांनी सेल्फी काढल्या.

नुकताच रोहित रेंज रोव्हर चालवताना दिसला
अलीकडेच रोहित शर्मा (Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सची जर्सी घालून रेंज रोव्हर चालवताना दिसला. रेंज रोव्हर व्यतिरिक्त रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये इतरही अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्या तो वेळोवेळी चालवताना दिसतो.

मुंबईने दोन विजयांसह पुनरागमन केले
आयपीएलचे पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सवर बरीच टीका होत होती. मात्र, मुंबईने दिल्ली आणि आरसीबीविरुद्ध सलग दोन विजय मिळवून बाउन्स बॅक केले आहे. रोहित आणि इशान किशन यांनी मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल