Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Eknath Shinde | बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार, हे या राज्याचे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटतेय, हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरू लागली असून उबाठाची १०० टक्के काँग्रेस झालीय, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे केली.

कोल्हापूरातील तपोवन मैदानात आयोजित महायुतीच्या प्रचंड सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उबाठा परिवार काँगेसला मतदान करणार हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सभेला लोटलेला प्रचंड जनसागर पाहून मुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित आहे. निवडणुकीनंतर धनुष्यबाण येईल व कोल्हापूरातून पंजा कायमचा हद्दपार होईल. कोल्हापूरकर यावेळी धनुष्यबाणाचा खटका ओढून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा