एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; केसरकर, सामंत, म्हात्रे यांच्यावर नवी जबाबदारी

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे (Sanjay More) यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Gulabrao Patil, MLA Uday Samant, Kiran Pavaskar, MLA Gulabrao Patil and Sheetal Mhatre) यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.