सलमान,आमीर,शाहरुख नव्हे तर आता बॉक्स ऑफिसवर फक्त रॉकी भाईची हवा

मुंबई – KGF Chapter 2 ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड (Records) मोडले आहेत. आता KGF Chapter ने SS राजामौली यांच्या RRR चा रेकॉर्डही मोडला आहे. KGF Chapter 2 हा आता भारतीय चित्रपटातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (The second highest grossing film) ठरला आहे. याने RRR चा रेकॉर्ड मोडला आहे.

व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन (Manobala Vijayabalan) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की KGF Chapter 2 ने RRR चा रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली 2 नंतर हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत बाहुबली 2 पहिल्या क्रमांकावर, KGF चॅप्टर 2 क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर RRR, चौथ्या क्रमांकावर 2.0 आणि पाचव्या क्रमांकावर दंगल आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Tarab Aadarsh) यांच्या KGF अध्याय 2 च्या हिंदी आवृत्तीच्या रेकॉर्डबद्दल देखील माहिती दिली आहे . केजीएफ चॅप्टर २ च्या हिंदी व्हर्जनने दंगलचा रेकॉर्ड मोडला असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी आवृत्तीही सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या यादीत बाहुबली 2 पहिल्या क्रमांकावर, KGF चॅप्टर 2 क्रमांकावर, दंगल तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेलुगू चित्रपट बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीने 510.99 कोटींचा व्यवसाय केला. त्याच वेळी, KGF Chapter 2 च्या हिंदी आवृत्तीने 391.65 कोटींचा व्यवसाय करून RRR चा विक्रम मोडला आहे.

KGF Chapter 2 बद्दल बोलायचे झाले तर प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन (Director Prashant Neel) केले आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, मालविका अविनाश आणि श्रीनिधी शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.