Murlidhar Mohol: शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध, मोहोळ यांची माहिती

Murlidhar Mohol: आयटी हब असलेल्या हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी असून, त्यामुळे नागरिकांना वेगवान, सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केले.

शिवाजीनगर गावठाण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते.

मोहोळ म्हणाले, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत पीएमआरडीए सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 23.3 किलोमीटर असून या मार्गावर स्थानकांची संख्या 23 इतकी आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर, औफ्लध, गणेशखिंड, खैरेवाडी, शिवाजीनगर आदी भागांना एकमेकांशी जोडणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात हडपसर व लोणी काळभोरपर्यंत विस्ताराची योजना आहे. सध्या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून, मे 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप