Sunil Tatkare | मातृशक्तीच्या माध्यमातूनच नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचेय

Sunil Tatkare |  देशात ‘नमो नारी शक्ती’ अभियान सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अदितीने चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी जाहीर केले आहे. या सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या मातृशक्तीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी महिला मेळाव्यात महिलांना केले.

महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण कॉंग्रेसने दिले नाही मात्र नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देऊन ही किमया केली आहे. क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतले आहेत. सूक्ष्म – लघू उद्योगातून ३३ टक्के सबसिडी महिलांना मिळते. बचत गटांना फिरता निधी ३० हजार रुपयांचा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी महिलांना दिली.

महिलांनी एकदा ठरवले तर ते हमखास मतदान होणारच यात शंका नाही. पेण शहरात भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे तुम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करु. विकास घडवायचा असेल आणि त्या विकासात आपला वाटा असावा यासाठी पेणकरांनो संसदेत आपला माणूस… लोकांची जाण असणारा लोकप्रतिनिधी सुनिल तटकरे यांच्या रुपाने पाठवायचा आहे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.

महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी मुद्रा योजना नरेंद्र मोदी यांनी आणली. शिवाय नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण संसदेत दिले. यासह अनेक योजना आणून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असे सांगतानाच ही निवडणूक गावकीची… भावकीची नाही तर ही निवडणूक देशाच्या सर्वोच्च सभागृहाची आहे यातूनच आपल्याला पंतप्रधान मिळणार आहे. सुनिल तटकरे यांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीचे मतदान असणार आहे. त्यामुळे आपल्या पेणचं मत हे राष्ट्रहितासाठी आहे हे लक्षात ठेवा असे आवाहन पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा मिळावा आणि पेण ते सीएसएमटीपर्यंत गाडी सुरू करावी जेणेकरून महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील अशी मागणीही प्रितम पाटील यांनी केली.

या महायुतीच्या महिला मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, नगरसेवक, आदींसह महायुतीच्या महिला तालुकाध्यक्षा, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका