OBC Reservation | ‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार’

OBC Reservation | एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना दुसऱ्या बाजूला अनेक ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक झाले आहेत. यातच आता जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी या उपोषणाला भेट दिली. यानंतर त्यांनी राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत ‘चुन चुन के गिरायेंगे’ असा इशाराच दिला. आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

सरकारने ओबीसीवर होतात असलेला हल्ला थांबवावा आणि कुणब्यांचे देत असलेले दाखले सरकारने थांबवावे आणि जीआर रद्द करावे.सग्या सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली आहे ती सरकारने मागे घ्यावी.सरकारला विनंती आहे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागला हे सांगावे.नाहीतर या उपोषणाचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप