दिल्लीचा बेपत्ता इंजिनिअर लोणावळ्याजवळील जंगलात मृतावस्थेत सापडला

पुणे – काही दिवसांपूर्वी दिल्लीचा एक इंजिनियर तरुण लोणावळा येथे फिरण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र अचानक तो काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव फरहान अहमद (farhan Aehmad) होते. आज त्याचा मृतदेह मिळाला आहे. हा तरूण २० मे रोजी बेपत्ता झाला होता.

बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा स्थानिक पोलीस आणि रेस्क्यू टीमने(Rescue team) प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नव्हता. आज त्या तरूणाचा मृतदेह सापडला आहे. यापूर्वी तरूण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी एक पत्रक काढत नागरिकांना मुलाला शोधून देण्याचे आवाहन केले होते. शोधून देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

तरुणाने बेपत्ता होण्याआधी आपल्या भावाला संर्पक करून ट्रेकिंगच्या जागेची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता आणि तो बेपत्ता झाला. आज त्याचा मृतदेह मिळाला आहे. आयएनएसच्या लोकांना बॉडी लोकेट झाली आहे. एनडीआरएफ सुद्धा घटनास्थळी पोहचले असून बेपत्ता तरूणाचे शोधकार्य संपल्याचे सांगण्यात आले आहे.