मातब्बर मंत्र्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात भूकंपाची शक्यता

रांची : झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता (Banna Gupta) यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बन्ना गुप्ता एका तरुणीशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. तर ती तरुणी न्युड आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी बन्ना गुप्ता यांच्यावर टीका सुरू केली आहे. तर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे, संजय सेठ आणि अन्य नेत्यांनीही याप्रकरणी कारवाईची मागणी केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रतुल शाहदेव म्हणाले की, या व्हायरल व्हिडिओची सत्यता अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत. हा व्हिडिओ खरा असेल तर बन्ना गुप्ता यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि तो खोटा असेल तर त्याचे खंडन करण्यात यावे, असे ते म्हणाले.