वयाने ६ वर्षांनी मोठी असलेल्या अंजलीपुढे अशी पडली सचिनची विकेट, ‘मास्टर ब्लास्टर’ची रोमँटिक लव्हस्टोरी

Sachin Tendulkar-Anjali Lovestory: भारतीय क्रिकेट संघाचा महान क्रिकेटपटू आणि क्रीडा विश्वात ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला 50 वा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) साजरा करत आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या सचिनने क्रिकेटच्या मैदानात तीन दशकांहून अधिक काळ घालवला, यादरम्यान त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. उजव्या हाताचा फलंदाज सचिनच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत असे अनेक विश्वविक्रम आहेत, जे कोणत्याही खेळाडूला मोडणे कठीण आहे.

क्रिकेटच्या मैदानात सचिनची जितकी चर्चा होते, तितकीच त्याच्या लव्ह लाईफचीही चर्चा झाली. 6 वर्षांनी मोठ्या असलेल्या डॉ.अंजली आणि   सचिनची प्रेमकहाणी खूप रोमँटिक (Sachin Tendulkar Lovestory) आहे. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी सचिन आणि अंजलीच्या प्रेमकथेच्या काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत…

पहिली भेट
सचिन आणि अंजलीची पहिली भेट विमानतळावर झाली, जेव्हा सचिन त्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून परतला होता आणि अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजली मेडिकलची विद्यार्थिनी होती, अभ्यासाच्या ओढीमुळे तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. सचिनला भेटल्यानंतर अंजलीने क्रिकेटबद्दल वाचायला सुरुवात केली. हळूहळू दोघांमध्ये संवादाचा सिलसिला वाढू लागला आणि जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

लपून-छपून भेटायला सुरुवात
सचिन आणि अंजलीला एकमेकांना भेटणं खूप कठीण होतं. अंजलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती सचिनला भेटायला जायची तेव्हा तिला कोणी ओळखणार नाही का याची भीती वाटत होती. कारण सचिनला कोणी ओळखले असते तर त्याच्यासाठी अवघड गेले असते.

सचिन अंजलीसाठी खोटे बोलला
अंजलीला आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठी सचिन खोटे बोलला होता. खरं तर, सचिन अंजलीची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून देण्यास टाळाटाळ करत होता, त्यामुळे त्याने अंजलीला पत्रकार बनवून तिच्या कुटुंबीयांना भेटायला लावलं.

1995 मध्ये लग्न झाले
5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजलीचे लग्न झाले. लग्नाच्या 2 वर्षानंतर सचिन आणि अंजलीने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. मुलगी साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. आणि 24 सप्टेंबर 1999 रोजी मुलगा अर्जुनचा जन्म झाला.