‘भारतात केवळ सनातन धर्म; इस्लाम, ख्रिश्चन धर्मच नाहीत’

अलिगड- वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा सध्या ट्रेंड आला असून अभिनेते,नेते, खेळाडू यापासून ते धर्मगुरू सुद्धा याच मार्गाने जाताना दिसून येत आहे. नुकतेच  महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाने (Kalicharan maharaj)पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे सुद्धा आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अलिगडमधील (Aligarh) संत समागममध्ये बोलताना कालिचरणनं म्हटलं आहे की, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी(Hindu Rashtra Nirmiti) सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम (Islam) , ख्रिश्चन(Christian)  हे धर्मच नाहीत, असं वक्तव्य कालिचरणनं केलं आहे.  इराक, इराण,  अफगानिस्तान आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देश आपल्या हातातून गेले आणि मुस्लिम राष्ट्र झाले, असं कालिचरणनं म्हटलं आहे.

कालिचरणनं यावेळी म्हटलं आहे की, देशाला इस्लामकडे घेऊन जात आहेत. देशात पाच लाख मंदिरं तोडली आहेत आणि 800 वर्षात 80 हजार महिलांसोबत बलात्कार झाला आहे. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही तर असं होतच राहिल. राजकीय इच्छाशक्तीतून हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते असं त्यानं म्हटलं आहे.