‘शरद पवार यांच्यावर बोलल्या शिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात’

सांगली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) लावण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कालच्या भाषणांनंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून ( Mahavikas Aghadi ) टीका होऊ लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil, State President of NCP ) यांनी देखील राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्या शिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंव्हा अन्य पक्षावर राज बोलले,तर लोक राज याना फार महत्व देणार नाहीत, म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

पाटील म्हणाले, अजून भाजपा ( BJP ) आणि मनसेची युती झालेली नाही, आणि भाजपाने पण मनसेला अजून कुठलं स्थान दिले नाही, मात्र केवळ ईडीच्या दबावाखाली, भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट राज ठाकरे वाचून दाखवत आहेत, तसेच एकीकडे राज ठाकरेनी हिंदूंच्या बद्दल बोलणं आणि दुसरीकडे ओवैसी ( Owaisi ) मुस्लिमांच्या बद्दल बोलणं म्हणजे, हे मतांचे धूर्वीकरणाचा डाव आहे,मात्र आता दोन्ही समाजातील लोक हुशार झाले आहेत,मतांच्या राजकारणासाठी सुरू असलेला डाव लोकाना कळत आहे. राज ठाकरे हे महागाईवर का बोलत नाहीत, सगळे महागले आहे, मुळ मुद्दा का विसरता, असा सवाल देखील जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांनी केला आहे.