Palestine vs Israel : इस्राईलची ताकत वाढली; दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ‘या’ बलाढ्य राष्ट्रांनी जाहीर केला पाठींबा

Palestine vs Israel अमेरिका (America), फ्रान्स (France), जर्मनी (germany), ब्रिटन (Britam) आणि इटलीनं (Italy) काल संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इस्राईलला पाठिंबा दिला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्राईलवर केलेल्या हल्ल्याचा या देशांनी तीव्र निषेध केला आहे. इस्राईलमध्ये आपल्या नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. ब्रिटनचे दहा आणि नेपाळचेही दहा नागरिक इस्राईलमध्ये मारले गेले आहेत. ऑस्ट्रिया आणि जर्मनीनं पॅलेस्टाईनला मदत स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (US President Joe Biden, French President Emmanuel Macron, German Chancellor Olaf Scholz, Italian Prime Minister Giorgia Meloni and British Prime Minister Rishi Sunak.) यांनी म्हटलं आहे, की हमासनं केलेल्या दहशतवादी कारवायांचं कोणत्याही प्रकारे समर्थन केलं जाऊ शकत नाही. हमासच्या अतिरेक्यांनी अनेक कुटुंबांची त्यांच्या घरात हत्या केली, दोनशे तरुणांची संगीत महोत्सवात हत्या केली आणि ज्येष्ठ महिला आणि मुलांसह अनेकांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं आहे.इस्राईल स्वतःच्या संरक्षणासाठी आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी करत असलेल्या सगळ्या प्रयत्नांना आम्ही साथ देऊ असं या देशांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईनच्या कायदेशीर मागण्यांची जाणीव असल्याचं या देशांनी नमूद केलं आहे, मात्र हमास या मागण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही आणि पॅलेस्टिनी नागरिकांना हिंसाचार आणि रक्तपात यांच्याशिवाय दुसरं काही देत नाही, असंही स्पष्टपणे म्हटलं आहे.

दरम्यान, इस्राईलकडून गाझापट्टीत हवाई हल्ले सुरूच आहेत. इस्राईलचे संरक्षणमंत्री योआव्ह गॅलंट यांनी गाझाला वेढा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्या भागातला वीज आणि इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सोळाशेपेक्षा जास्त झाली असून, गाझा पट्टीतून सुमारे सव्वा लाख लोकांनी घर सोडलं आहे. इस्राईलमध्ये 900 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2600 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गाझा पट्टीत इस्राईलच्या हवाई हल्ल्यात सहाशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे आणि 2700 नागरिक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया